महिलांनी एसटीच्या प्रवासी भाडे सवलतीचा लाभ घ्यावा !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार यावल तालुक्यातील महिलांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.

 

यावल एसटी आगाराचे व्यवस्थापकांनी महिला प्रवासांना कोणत्या एसटी बस मध्ये ५० % टक्के सवलतीचा प्रवास करता येइल याबाबतची माहिती देतांना गाडीचे वेळापत्रक व शेड्अल प्रमाणे बसचा प्रवास कसा असे याची माहिती त्यांनी जाहीर केली असुन ती पुढील प्रमाणे यावल बसस्थानकावरून सुटणाऱ्या गाडया यावल-धुळे सकाळी ६ वाजता , यावल- अकोला सकाळी ६.३० वाजता सुटेल , यावल-बडोदा (गुजरात ) सकाळी ६ ,४० वाजता , यावल-माहुरगड सकाळी ७.१५ वाजता, यावल- बलसाड वापी ( गुजरात ) सकाळी ७ , १५ वाजता , यावल बु्ऱ्हाणपुर सकाळी ७ , ३० वाजता , यावल ते पुणे सकाळी ७, ३० , यावल जळगाव मार्ग लातुर सकाळी ८ वाजता , यावल ते पुणे, यावल उधना ( गुजरात ) सकाळी ८ वाजता, यावल कल्याण सकाळी ७ , १५ वाजता , यावल जळगान पुणे सकाळी ८ , २०वाजता , यावल ते छत्रपती संभाजी नगरसुटण्याची वेळ सकाळी १० वाजता , रावेर यावल धुळे सकाळी ११, ३० वाजता , बुऱ्हाणपुर यावल शिर्डी दुपारी १२, ३० वाजता , यावल धुळे बसची वेळ दुपारी १ वाजता, यावल ते छत्रपती संभाजी नगर करीता दुपारी १, ३० वाजता ,यावल पिंपळनेर ही बस दुपारी १वाजुन४५ मिनिटांनी सुटेल , यावल ते चाळीसगाव ही बस दुपारी २.१५ वाजता निघेल, यावल जळगाव मार्ग पुणे ही बस दुपारी ४.३० वाजता बस राहणारआहे.

 

प्रवासांचा आपल्या लाडक्या लालपरी वाढता प्रतिसाद बघता प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी प्रतिदिन यावल ते भुसावळ सकाळच्या ५ वाजे पासुन रात्रीच्या ९.३०पर्यंत दर अर्ध्या तासांने शटल बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. सदरची माहिती आपण प्रवासांच्या हितासाठी देत आहोत, तरी प्रवासांनी एसटी बस ने सुरक्षीत व सुखाचा प्रवास करावा असे आवाहन यावलचे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले अआहे.  प्रवासी बसेस वेळेवर सुटाव्यात याची जबाबदारी थावल आगारचे वाहतुक निरिक्षक कुंदन वानखेडे , सिद्धार्थ सोनवणे , सहाय्यक वाहकतुक निरिक्षक के.ए. चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे .

Protected Content