धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मरीमाता मंदीर यात्रेत महिला शिक्षिकेच्या गळ्यातून ८८ हजार रूपये किंमतीची सोन्याची माळ चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आली आहे. मंदीराच्या सीसीटीव्हीत अज्ञात चोरटा कैद झाल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरात मंगळवार १६ ऑगस्ट रोजी रोजी मरीमाता मंदिर येथे यात्रोस्तवाचा कार्यक्रम सुरू आहे. या यात्रोत्सवा भाविकांची मोठी वर्दळ असते मरीमातेच्या दर्शनासाठी महिलांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळेस धरणगावातील मातोश्री नगरातील रहिवासी निवृत्त शिक्षिका रजनी हरियाचंद्र सूर्यवंशी (वय ६४) हे सुद्धा यात्रेत सहभागी झाले होते. कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील ८७ हजार ५०० रुपये किमतीची २५ ग्राम सोन्याची मोहल माळ लांबवली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात रजनी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ नाना ठाकरे हे करीत आहेत. पोलीसांनी मंदीर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता एका महिलेच्या वेशात अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवितांना दिसून आले आहे. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली असून लवकरच चोरटा पोलीसांच्या जाळ्यात येण्याची शक्यता आहे.