महिला दक्षात समिती कार्यालयासमोर महिलेचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महिला दक्षता समिती कार्यालयाच्या बाहेर दोन जणांनी ३५ वर्षीय महिलेला अश्लिल शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी २ मार्च रोजी दुपारी २ वाजता घडला आहे. याप्रकरणी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ३५वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास महिला ही तिच्या बहिणीसोबात पोलीस मुख्यालयातील महिला दक्षता समितीमध्ये चौकशीची तारीखसाठी गेल्या होत्या. दरम्यान, त्याठिकाणी चेतन भास्कर चौधरी (वय-२८) आणि भास्कर रामा चौधरी (वय-५५) दोघे रा. आसोदा ता.जि.जळगाव यांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत महिलेचे कपडे फाडले आणि लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी चेतन भास्कर चौधरी (वय-२८) आणि भास्कर रामा चौधरी (वय-५५) दोघे रा. आसोदा ता.जि.जळगाव यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक पल्लवी मोरे करीत आहे.

Protected Content