यावल महाविद्यालयात करिअर संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागामार्फत एमबीए प्रवेश परिक्षा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

प्रमुख वक्ते म्हणून, एम.बी.ए. इन्स्टिट्यूट साकेगाव येथील ग्रंथपाल विनोद काकडे व प्रा. योगेश रोटे उपस्थीत होते. यावेळी विनोद काकडे यांनी विद्यार्थ्यांना एम.बी.ए. प्रवेश प्रक्रिया, सीईटी अभ्यासक्रम आणि करिअर संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील यांनी कोणत्याही शाखेच्या पदवी नंतर एम.बी.ए.ला प्रवेश घेता येतो, त्यासाठी कोणतेही दडपण न ठेवता विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी व जिद्द असायला हवी असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. डॉ . एस.पी.कापडे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे प्रा.डॉ. अनिल पाटील यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content