महाराष्ट्र वाणी युवा मंचतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

पाचोरा, प्रतिनिधी | महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरा तर्फे गुनवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भडगाव येथील महालपुरे मंगलकार्यालयात उत्साहात आज दुपारी संपन्न झाला. तत्पूर्वी सदर समारंभाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरा तर्फे गुनवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन आज भडगाव येथील महालपुरे मंगलकार्यालयात आज दुपारी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोहटार येथील सुंदरबाई सिताराम मालपुरे, माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन विजय रामकृष्ण मालपुरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा येथील संस्कार वाणी संस्थापक अध्यक्ष योगेश येवले, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, भा. ज. पा. शहराध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा महाराष्ट्र पें. अ. पुणे कोषाध्यक्ष यादवराव सिनकर, ज्येष्ठ सल्लागार राजेंद्र चिंचोले व्यासपीठावर होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यी व विद्यार्थीनींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखाध्यक्ष लक्ष्मण सिनकर यांनी केले. तर सूत्रसंचालन राज्य कार्यकारिणी सदस्य डी. आर. कोतकर, विशाल ब्राम्हणकर यांनी केले. याप्रसंगी परिसरातील प्रथम कन्यारत्न प्राप्त दाम्पत्यांचा सत्कार भाजपा शहराध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी व संगिता रमेश वाणी यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष विशाल ब्राम्हणकर, उपाध्यक्ष अशोक बागड, शाखाध्यक्ष लक्ष्मण सिनकर, खजिनदार विवेक ब्राह्मणकर, तालुका अध्यक्ष किरण अमृतकर, ज्येष्ठ संघटक प्रविण शेंडे, संस्थापक शाखाध्यक्ष डी. आर. कोतकर, कार्यकारिणी सदस्य योगेश शेंडे, रमेश महालपुरे, हर्षल माकडे, महेंद्र महालपुरे, संदिप महालपुरे, विजय सोनजे, प्रकाश येवले, सुनिल कोतकर, गणेश सिनकर, संजय शेंडे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content