बोढरेत भव्य रक्त तपासणी शिबिर उत्साहात

चाळीसगाव, प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महानिर्वाण दिनाच्या औचित्य साधून कै. महादेव रामेश्वर परदेशी यांच्या स्मरणार्थ मोफत भव्य रक्त तपासणी शिबिर तालुक्यातील बोढरे येथे आज सकाळी उत्साहात संपन्न झाले. यावेळी नव्वद जणांनी रक तपासणी करून घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६५ वा महानिर्वाण दिन आहे. या दिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील बोढरे येथे कै. महादेव रामेश्वर परदेशी यांच्या स्मरणार्थ मोफत भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिबिराला सुरूवात करण्यात आली.
यावेळी नव्वद जणांनी रक तपासणी करून घेतली. दरम्यान सदर शिबिर हे मोफत असल्याने मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेतला. व उत्साहाचे वातावरण निर्माण केले. पंडित महादेव परदेशी व समाजसेवक जितेंद्र पंडित परदेशी यांच्या अथक परिश्रमातून ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी समाजसेवक जितेंद्र परदेशी हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असते. यावेळी डॉ. सचिन खेडेकर, डॉ. प्रियंका खेडेकर, कृषी सहायक तुफान खोत, तलाठी गुरव अप्पा, पोलिस पाटील राजेंद्र पाटील, माजी सरपंच संजय जाधव, पितांबर जाधव, एकनाथ आनंदा, खेमराज पांडू, साहेबराव पांडू, उकडू चव्हाण व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक वासुदेव चव्हाण यांनी मानले.

Protected Content