शिरसोली येथील प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

रघुनाथ रामदास अस्वार (वय-४२) रा. शिरसोली ता.जि. जळगाव असे मयत प्रौढाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, रघुनाथ अस्वार हे मोल मजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होते. रविवारी ५ डिसेंबर रोजी घरात कुणीही नसतांना त्यानी घराचा दरवाजा आतून बंद करून दोरीने छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेवून त्यांचा मृतदेह खाली उतरवला. जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रघुनाथ अस्वार यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, १ मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

Protected Content