महापुरूषांचा अवमान केल्याप्रकरणी रास्ता रोको आंदोलन (व्हिडीओ )

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महापुरूषांचा अपमान करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बांभोरी येथे महामार्गावर मंगळवार १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शिव, फुले, शाहू, आंबेडकर प्रेमी यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलन करण्यापुर्वीच लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह समर्थकांना रामानंदनगर पोलीसांनी अटक केली आहे.

 

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात महापुरूषांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याचा पडसाद संपुर्ण राज्यात उमटत आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का दिल्याचे काम भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यापध्दतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी महापुरूषांबाबत चुकीची माहिती देवून नागरीकांची दिशाभूल करत आहे. यांच्या निषेधार्थ शिव, फुले, शाहू, आंबेडकर प्रेमी व्यक्ती संघटना व संस्थेच्या वतीने बांभोरी पुलावरीलराष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महापुरूषांचा अवमान करणाऱ्यांची आपल्या पदावरून हाकलपट्टी करावी अशी मागणी करत सत्ताधारी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनस्थळी लोकसंघर्ष मोर्चाचे समन्वयक सचिन धांडे, ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी, उपमहापौर कुलभूषण पाटील, रमेश पाटील, राकेश पाटील, माजी उपमहापौर करीम सलार यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

रामानंद पोलीस ठाण्यात लोकसघर्ष मोर्चा च्या प्रतिभाताई शिंदे, मुकुंद सपकाळ यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. तेथे पुरोगामी संघटनेसह काँग्रेस आय, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली. यावेळी ” सरकार हमसे डरती है पोलिस को आगे करती है”,  चंद्रकात पाटील राजीमाना द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा ज्योतीबा फुले की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय” च्या घोषणांनी रामानंद पोलीस ठाण्याचा परीसर दणाणले. यावेळी पोलीसांनी काय कारवाई केली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात  पोलीस अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पोलीस ठाण्यात  कॉंग्रेस पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक अजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस च्या महीला माहनगरअध्यक्षा मंगलाताई पाटील,अॅड विजय पाटील  राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा अभिलाषा रोकडे आदी उपस्थित होते.

 

 

भाग १

भाग २

भाग ३

Protected Content