गोर सेनाचे विविध मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विमुक्त जाती व व्हीजेएन या प्रवर्गातील खोटे राजपुत भामटा यांची अवैध घुसखोरी कायमस्वरूपी रोखणे व राजपुत भामटा जातीतुन भामटा शब्द हटविण्यात येवु नये, या मागणीसाठी गुरूवारी १ जुन रोजी जळगाव जिल्हा गोर सेना व समाज संघटनांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमुक्त जाती प्रवर्गमध्ये मागिल अनेक वर्षापासून बिगर मागास असलेल्या जातीतील नागरीकांनी मोठया प्रमाणात अवैध रित्या घुसखोरी केलेली असल्यामुळे मुळ विमुक्त जाती प्रवर्ग (अ) मधील लोकांवरती सातत्याने अन्याय होत असून शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीच्या क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. दरवर्षी साधारणत नोकर भरतीमध्ये व शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश प्रक्रिसरेत पाच हजाराहून अधिक विद्यार्थी व नोकरदरावर अन्याय होत असतांना दिसून येत आहे. विशेषतः राजपुत समाजातील लोकांनी राजपुत भामटा जातीच्या नावाचा गैरफायदा घेवुन अवैधरित्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविल्याचे दिसून येत आहे. संदर्भात गोर सेनेकडून आंदोलन करूनही शासनाकडून प्रतिबंध घालण्यात आलेला नाही. असे मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी गोर सेनाचे जिल्हा सचिव चेतन जाधव, सुभाष राठोड, भारमल नाईक, शिवदास पवार, सुनिल महाजन, अनिल राठोड, अभिजित चव्हाण आदी उपस्थित होते.

Protected Content