महागाई विरोधात कॉंग्रेस राबविणार जनजागरण अभियान (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारने केलेल्या महागाईबाबत घरोघरी जाऊन १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जळगाव शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष शामकांत तायडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी प्रदीप सोनवणे, जाकीर बागवान, दीपक सोनवणे, मालोजीराव पाटील, रवी चौधरी, ज्ञानेश्वर सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान दि.१४ ते २९ नोव्हेंबर पर्यंत राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जळगाव शहरात शहरातील वार्डा-वार्डात जाऊन ‘पथनाट्य’ सादर केले जातील. शहरातील वार्डा-वार्डात जाऊन ‘प्रभातफेरी’, शहरातील प्रमुख चौकांमध्ये ‘चित्रफितीद्वारे युपीएचे सरकार व बीजेपी सरकार यातील तफावत सादरीकरण करण्यात येणार आहे. महागाई विश्लेषण केलेले पत्रके घरोघरी वाटण्यात येणार आहेत. याबाबत शहरातील प्रमुख भागांमध्ये ‘डिजीटल बॅनर’ होडींगद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जनजागरण अभियान राबवून काँग्रेस सदस्य नोंदणी केली जाणार आहे. कॉंग्रेस आपल्या दारी हे अभियान राबवून कॉंग्रेस घरा -घरापर्यंत पोचविण्याचा मानस शामकांत तायडे यांनी बोलून दाखविला.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4567038990024244

 

Protected Content