जळगाव । येथील मराठी प्रतिष्ठानतर्फे अपघात किंवा अन्य कारणाने ज्यांचे हात कोपरा पासून किंवा कोपराच्या वर पासून कापले गेले असतील अथवा जन्मतः हात नसतील अशा व्यक्तींना कृत्रिम हात लावण्याचे शिबिर प्रथमच जळगांव शहरात आयोजित करण्यात येत आहे.
भारतात दरवर्षी ४० हजार लोकांचे विविध कारणाने हात कापले जातात.कृत्रिम हाताची किंमत जास्त असल्याने अनेक लोकं असे हात बसवू शकत नाही.म्हणून सामाजिक जबाबदारी समजून प्रतिष्ठान शिबिराचे आयोजन करत आहे. हा कृत्रिम हात पुर्णतः इलेक्ट्रॉनिक हात आहे. यात१२ वॅट बॅटरी वर ८ तास हाताची हालचाल करता येते.
१० किलो पर्यंत वजन उचलता येते. हा हात सहज लावता येत असून यासाठी दोन वर्षांची वॉरंटी प्रदान करण्यात आलेली आहे. दारिद्य्र रेषेखालील व्यक्तींना शिबिरात कृत्रिम हात निःशुल्क लावले जातील. तर आर्थिक सक्षम असलेल्या व्यक्तींना कमी दरात कृत्रिम जात लावले जातील. याशिबिराचा लाभ फक्त जळगांव जिल्ह्यातील व्यक्तींनाच घेता येणार असून गरजू व्यक्तींची नाव नोंदणी दि.१ मार्च ते १५ मार्च२०२० पर्यंत करण्यात येणार आहे. शिबिर एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे. आधार कार्ड,पोस्ट कार्ड साईझ फोटो, दारिद्र्य रेषे खालील व्यक्ती असल्यास पिवळे कार्ड(ओरिजिनल) व त्याची झेरॉक्स,बँक पास बुक चे सहा महिन्यांचे स्टेटमेंट,मोबाईल नंबर आदी कागदपत्रे नाव नोंदणीसाठी आवश्यक राहणार आहेत. देशपांडे मोटर ड्रायव्हिंग स्कूल, आर टी ओ ऑफिस समोर, गणपती नगर,जळगाव;विजयकुमार रामदास वाणी नवी पेठ,जळगाव; खुशल ऑटोमोबाईल कालिका माता मंदिर रोड व ग्लोबल मीटर सर्व्हिसेस रेड क्रॉस समोर, बी जे मार्केट येथे नोंदणी करण्यात येणार असून १५ मार्च नंतर नाव नोंदणी केली जाणार नसल्याचे मराठी प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, मराठी प्रतिष्ठान लोकवर्गणीतुन व लोक सहभागातून समाज उपयोगी प्रकल्प राबवते ज्याचा मुळे समाजातील अनेक लोकांच्या जीवनात आनंद येईल हा एकमेव उद्देश असतो. म्हणून सहभागी व्यक्ती व संस्था यांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.