कार्यतत्पर नायब तहसिलदार तायडे उद्या सोडणार पदभार

 

रावेर प्रतिनिधी । लोकांचे तत्परतेने केलेले काम व त्यांचे समाधान हिच चांगल्या प्रशासनाची ख-या कसोटी असते, या कसोटीस रावेरचे निवासी नायब तहसीलदार खरे उतरले आहे.  सर्वांना आपलेशे वाटणारे रावेरचे सजंय तायडे यांची भुसावळला बदलीची झाल्याची वार्ता समजताच त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात झालेली गर्दी त्यांनी सर्वसामन्यांच्या मनात आपल्या कामांनी घर केले असल्याचे प्रतिक आहे.

सजंय तायडे हे  रावेर महसूल विभागात निवासी नायब तहसिलदार सुमारे दोन वर्षा पूर्वी रावेरात रुजू   झाले होते.  त्यांच्या कार्यकाळमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या यामध्ये अत्यंत शिस्त पध्दतीने वरीष्ठाच्या आदेशावरुन निवडनुका पार पडल्या. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन प्रशासनाने सजंय तायडे यांना प्रशिस्तपत्र देऊन फैजपुर विभागात एकमेव निवासी नायब तहसीलदाराने सन्मानित केले. यानंतर सुमारे पाचवर्षा नंतर २०१९ मध्ये रावेर महसूलची शंभर टक्के वसूली झाली यात देखिल त्यांचा मोलाचा वाटा होता. याच दरम्यान अवैध गौण खनिजवर देखिल त्यांनी धडाकेबाज कारवाई करत शासनाला महसूल वसूल करुन दिले. सजंय तायडे सकाळी दहा वाजल्यापासून महसूल कार्यालयात आल्या नंतर वरीष्ठ अधिकारी घरी गेल्या नंतरच ते आपल्या घरी जातात. या दरम्यान जातांना रस्त्याने कोणी गरीब बेसहारा दिसला की गाडी थांबवुन त्यांना मदत करण्याची त्यांना आधी पासून आवड आहे. यावर्षी देखिल कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तायडे यांनी स्वत:च्या जवळून अनेक गरीब कुटुंबाना आर्थिक मदत करून किट्स वाटप केले. भुसावळ येथून रावेरला कार्यालयात येतांना कोरोना काळात पायी घर गाठणा-या लोकांना सजंय तायडे यांनी चप्पला व बिस्किट वाटप करत मानवतेचा धर्म निभवला. अनेक कर्मचा-याना सजंय तायडे आज सुध्दा मार्गदशन करतात. शासकीय कामे घेऊन बाहेरुन कितीही संतापात आलेल्या नागरीक निवासी नायब तहसीलदार यांच्या दालनात आले की आलेल्या नागरीकांना शांत करून त्यांचे काम मार्ग लावण्याची अद्भुत कला सजंय तायडे यांच्यात आहे. यामुळे ते सर्वांना आपलेशे वाटणारे झाले. सजंय तायडे यांची रावेर येथून बदली झाल्याने अनेकां दु:ख झाले. साहेब तुम्ही पुन्हा या अश्या सदिच्छा भेटायला आलेले इष्टमित्र नागरिक देत आहे. अजुन वर्ष-दोन सजंय तायडे रावेरला थांबायला हवे होते. आपल्या कामांबद्दल नागरिकांच्या तोडूंन ऐकलेले उद्गार पाहुन सजंय तायडे यांना देखील समाधान आहे. सजंय तायडे म्हणतात, मला रावेर येथे शासनाची शंभर टक्के वसूली करण्यात जास्त समाधान आहे. तसेच मित्रांचे प्रेम जनेतचे केलेल्या कामांचा आशीर्वादामुळे भुसावळात देखील यापेक्षा चांगले काम करणार असल्याची भावना त्यांनी माध्यमांकडे व्यक्त केली.

Protected Content