नांदखुर्देचे सरपंच साईनाथ पाटील अपात्र

 

कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या नांदखुर्दे येथील सरपंच साईनाथ कौतिक पाटील हे अतिक्रमण केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे.

नांदखुर्दे येथील सरपंच साईनाथ पाटील हे सार्वत्रिक निवडणूक २०१५ मध्ये सदस्य पदांवर निवडून आले होते. सरपंच पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत ग्रा.पं. हद्दीतील बखाळ जागा ग्रा.पं. च्या मालकीची सार्वजनिक जागेवर मालमत्ता क्र.२२०/ १ क्षेत्र , ७२५ स्वेक. फूट या जागेवर अतिक्रमण करून सदर जागा नावावर उतरवल्याचे स्पष्ट झाले. म्हणून येथील ग्रामस्थ राजेश जयराम पवार यांनी दि १२ मार्च २०१९ रोजी तक्रार केली. त्यावर जळगाव जिल्हा अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या कोर्टात सुनावणी ११ महिने सुनावणी झाली. या सुनावणीअंती सरपंच साईनाथ पाटील यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर जागेचावापर करत कलम ‘१४ ज’ च्या तरतुदींचा भंग केला असल्याने त्यांना अपात्र करण्यात आले.

Protected Content