बाळासाहेब असते, तर उद्धव मुख्यमंत्री झालेच नसते – राणे

narayan rane 650x400 81462301267

 

नागपूर वृत्तसंस्था । आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. अशी टीका भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केली. तसेच बाळासाहेब नेहमी म्हणायचे त्यांना मुख्यमंत्रिपदामध्ये रस नाही. माझ्यासाठी हिंदुत्व महत्वाचे, मात्र उद्धव ठाकरेंचे यात वैयक्तिक स्वार्थ आहे.” असेही राणे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्रीपद मिळवायचं या एकाच उद्देशाने महाविकास आघाडी झाली. विचारांना मूठमाती देऊन हे सरकार अस्तित्त्वात आलं आहे. या सरकारने विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी कोणताही विचार केलेला नाही अशीही टीका नारायण राणे यांनी केली. नागपुरातल्या अधिवेशनात त्यांनी हजेरी लावली होती. हे हिवाळी अधिवेशन हे अधिवेशन वाटत नाही तर एखादा घरगुती कार्यक्रम वाटतो, अशीही टीका नारायण राणे यांनी केली.

सरकार आल्यानंतर कोणते निर्णय घ्यावेत? कोणते प्रकल्प असावेत? या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे होते. कोणत्याही तत्त्वाला, विचारधारेला धरुन ही महाविकास आघाडी झालेली नाही. शिवसेना हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे. शिवसेनेचा जन्मच हिंदूंसाठी झाला. तर काँग्रेसही धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. या दोन पक्षांच्या विचाराधारांमध्येच फरक आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली. उद्धव ठाकरेंनी ही आघाडी फक्त मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून केलेली आहे. राज्य, राज्याची जनता यांचा कोणताही विचार त्यांनी केलेला नाही असाही आरोप नारायण राणे यांनी केला.

Protected Content