महाजय द्वयीकडे भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाची धुरा !

रावेर raver प्रतिनिधी । भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रावेर तालुक्यातुन जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन व पद्माकर महाजन यांची निवड झाली असून या माध्यमातुन दोघांना पक्ष संघटनेवर काम करण्याची दोघांनाही संधी मिळणार आहे.

भाजपा jalgaon bjp ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे mla rajumama bhole यांनी जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केली यात जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन( तांदलवाडी) यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी देत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. तर पद्माकर महाजन (रावेर) यांची पुन्हा जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्त केले आहे. यासोबत कोषाध्यक्ष पदी अनिल खंडेलवाल, कार्यालय मंत्री पदी गणेश भगवान माळी यांना जबाबदारी देण्यात आली असून ६० कार्यकारणी सदस्य जाहीर करण्यात आले आहेत.

या सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेष दादा पाटील, आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, आ.चंदूभाई पटेल, महाराष्ट्र राज्य जनजाती संपर्क प्रमुख किशोर काळकर, माजी आ.स्मिताताई वाघ, जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content