युवासेनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

जळगाव प्रतिनिधी । गुजरात पेट्रोल पंपाजवळ भरणार्‍या बाजारामुळे येथे दर बुधवारी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी युवासेनेने केली असून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरात दर बुधवारी भरणार्‍या आठवडे बाजारामुळे गर्दी होऊन अपघात होतात. त्यासाठी दर बुधवारी या परिसरात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकेची आपत्कालीन सुविधा पुरवावी अशी मागणी युवा सेनेतर्फे शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पिंप्राळा परिसरात दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. तसेच लहानमोठे अपघात होतात. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे दर बुधवारी गुजराल पेट्रोल पंप परिसरात १०८ रुग्णवाहिकेची आपत्कालीन सुविधा म्हणून मिळावी अशी मागणी या निवेदनात केली असून हे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांना देण्यात आले आहे. यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, महानगर प्रमुख स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, संकेत कापसे, नीलेश सपकाळे, अंकित कासार, राकेश चौधरी व कैलास बारी उपस्थित होते. दरम्यान, या मागणीवर सकारत्मक प्रतिसाद मिळाला असून रूग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार असल्याची ग्वाही शल्यचिकित्सकांनी दिली.

Protected Content