ओबीसींना संवैधानिक आरक्षण द्या : समता परिषदेचा ठराव

नवी दिल्ली वृत्तसंस्था | छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत झालेल्या समता परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत ओबीसींना संवैधानिक आरक्षण प्रदान करण्यात यावेत यासह अन्य ठराव संमत करण्यात आले.

 

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. याप्रसंगी छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणासह ओबीसींच्या प्रश्नांवर आपण आवाज उठवला पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणावर निर्णय झालाच पाहिजे. किमान जे आहे ते तरी राहिले पाहिजे. केंद्राकडे आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला इम्पेरिकल डाटा द्यावा. आम्ही ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ, असं भुजबळ म्हणाले.

 

२०१०मध्ये झालेल्या जनगणनेचा इम्पेरिकल डेटा देण्यात आला नाही. राज्यांना अजून हा डाटा दिला गेलेला नाही. हा डेटा लवकरात लवकर आम्हाला मिळावा. नाही तर त्याचा ओबीसी आरक्षणावर परिणाम होऊन ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहील, असं त्यांनी सांगितलं.

Protected Content