मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे भगवान गौतम बुध्द जयंती साजरी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने भगवान गौतम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, अनुसूचित जाती जिल्हाउपाध्यक्ष बी.डी.गवई, मुक्ताईनगर कॉग्रेस शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, माजी तालुकाध्यक्ष अँड.अरविंद गोसावी, युवक विधानसभा अध्यक्ष निरज बोराखेडे, निखिल चौधरी, बिस्मिल्ला खान, हमिद जमादार,अँड. कुणाल गवई , अंबुजाभाई, आनंदा कोळी, पवन कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content