मराठा आरक्षणाबाबत रावेरात विश्व मराठा संघातर्फे तहसीलदारांना निवेदन

रावेर प्रतिनिधी । मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवून चालू वर्षाकरीता शिक्षण व शासकीय सेवांमध्ये लाभ मिळण्याबाबत विश्व मराठा संघ तर्फे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थागितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करुन स्थगिती उठवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. राज्याला असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करुन मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय सेवांमध्ये लागू असलेले SEBC आरक्षण अखंडित ठेवण्यासाठी त्वरीत अध्यादेश काढावा. मराठा आरक्षण स्थगितीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या वाटयाला येणाऱ्या शासकीय नोकर भरतीमधील सर्व जागा रिक्त ठेवण्यात याव्यात किंवा सर्व प्रकारच्या नोकर भरती स्थगित करण्यात याव्या. ओबीसी समाजाला इंद्रा सहानी निकालाचे निकष डावलून कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण न करता देण्यात आलेली मुदतवाढ देखील २०१९ मध्ये संपलेली असून ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न यामुळे निकाली निघू शकतो याबाबत भूमिका स्पष्ट करावी, आरक्षण लागू होईपर्यंत मराठयांसाठी विशेष योजना लागू करा.

या निवेदनावर विश्व मराठा संघ रावेर तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे, तालुका उपाध्यक्ष शुभम चौधरी, तालुका कार्याध्यक्ष अमोल पाटिल, तालुका संघटक चेतन पाटिल, सहसंघटक चेतन पाटिल, तालुका सचिव वेदांत पाटील, रेभोटा शाखाप्रमुख प्रेम पाटिल, कल्पित जावरे, श्याम शिवरामे आदी उपस्थित होते.

Protected Content