कोरोना: जामनेरात आशा, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण

जामनेर प्रतिनिधी । संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोरोना आजाराची लक्षणे शक्यता लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा देण्याकरता आरोग्य विभागातील व खाजगी वैद्यकीय सेवेतील मनुष्यबळ कमी पडण्याची शक्यता असल्याने २० आशा स्वयंसेविका व ३२ अंगणवाडी सेविकांना आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण, उपचाराबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्याकडून व बालविकास प्रकल्पाधिकारी आय.सी.गोयल यांच्या उपस्थितीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.एस.लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. जामनेर नगरपालिकेचे गटनेते डॉ.प्रशांत भोंडे यांनी पाण्याचे टँकर, बादली, साबण, मघ उपलब्ध करून दिलेत. संपूर्ण देशभरात लॉक डाऊन असतांना ये-जा करण्यास कोणतेही वाहन उपलब्ध नसतांना सदर प्रशिक्षणास २० आशा व ३२ अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. त्यांचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्याकडून कौतुक करण्यात आले. आलेल्या प्रशिक्षणार्थी यांना एक ते दीड मीटर अंतरावर बसवण्यात आले होते व सोशल डीस्टनसिंग पाळण्यात आलेले दिसून आहे. प्रत्येकाला बाहेर साबणाने हात स्वच्छ धुवूनच प्रवेश देण्यात आला.

यावेळी प्रशिक्षणार्थ्यास मास्क, पोस्टर, महितीपुस्तिका व जनजागृती पत्रके वाटण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये रुग्ण संख्या वाढल्यास आशा व अंगणवाडी सेविका यांना नर्सिंग स्टाफ म्हणून काम करायचे आहे. त्यामुळे कोरोना आजार काय आहे त्याची लक्षणे, उपचार, स्वतःची घ्यावयाची काळजी, पीपीई कसे घालायचे कसे काढायचे त्याची विल्हेवाट कशी लावावी व ग्रामपातळीवर सरपंच,पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांच्या मदतीने नागरिकांची जनजागृती व समुपदेशन कसे करावे. नागरिकांची मानसिकता कमकुवत होणार नाही. याबाबतच्या उपाययोजना व प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बशीर पिंजारी, आशा कुयटे, नरेंद्र तंवरत, राजू माळी यांचे प्रशिक्षणास सहकार्य लाभले.

Protected Content