श्री स्वामीनारायण गुरुकुल येथे शिक्षापत्री ग्रंथाचे सामूहिक पठण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सुमारे १९८ वर्षांपूर्वी भगवान स्वामीनारायण यांनी मानवधर्म कसा असावा, जीवन जगतांना कोणती पथ्ये पाळावीत ह्याच्या मार्गदर्शनासाठी लिहिलेल्या शिक्षापत्री ग्रंथाच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल येथे ५०० युवक युवतींनी शिक्षापत्री ग्रंथाचे सामूहिक वाचन केले, गुजरात मधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिरातील वक्ताश्री ईश्र्वरस्वरुपदास शास्त्री यांनी पठण केले.यावेळी अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष गुजरात राज्यातील वासद मंदिराचे के.के.शास्त्री हे होते.

यावेळी शिक्षापत्री पठणासाठी सातोद, कोळवद, डोंगर कठोरे, आमोदा, बामनोद, सांगवी येथील ५०० युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वासद ,गुजरात येथून विष्णुप्रसादस्वामी , राधास्वामी, घनश्याम स्वामी, जळगाव चे नयनप्रकाश शास्त्री, गोविंदप्रकाश स्वामी, सावदा गुरुकुलचे भक्तिकिशोर शास्त्री, भुसावळ मंदीराचे धनप्रसादशास्त्री व इतर संतगण तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन स्वामीनारायण गुरुकुल चे सचिव ऋषीप्रसाद स्वामी यांनी केले होते.

Protected Content