.
नवी दिल्ली: वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे केंद्रीय कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांचे मन बदलण्याचा प्रयत्न केला. काही शेतकऱ्यांची उदाहरणे देत पंतप्रधानांनी केंद्रीय कृषी कायद्याचे फायदे सांगितले.
पंजाब आणि हरयाणाच्या हजारो शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत आहेत. विरोधी पक्ष देखील कृषी कायदा हा ‘काळा कायदा’ असल्याचे म्हणत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हणाले की, ‘भारतात शेती आमि शेतीशी संबंधित गोष्टीसोबत नवे आयाम जोडले गेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या कृषी कायद्यांधील सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडले गेले आहेत. या हक्कांनी अतिशय कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. बराच विचार केल्यानंतर भारताच्या संसदेने कृषी सुधारणांना कायद्याचे स्वरुप दिले. या सुधारणांमुळे केवळ शेतकऱ्यांची बंधनेच नष्ट झालेली नाहीत, तर त्यांना नवे हक्क देखील मिळालेत, नव्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत.’