नवी दिल्ली वृत्तसंस्था । छत्रपति शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तक आज प्रकाशित करण्यात आले असून याच्या विरोधात आता सुरू उमटू लागल्याचे दिसून येत आहेत.
जय भगवान गोयल या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्याने आज दिल्ली प्रदेश कार्यालयातील धार्मीक व सांस्कृतीक संमेलनात एका पुस्तकाचे प्रकाशन केले. आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या नावाने हे पुस्तक असून यात पंतप्रधान मोदी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यांनतर भाजपचे नेते भगवान गोयल यांनी आपल्या फेसबुक व ट्वीटर खात्यावरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
यात शिवरायांसोबत पंतप्रधानांची तुलना करण्यात आली असून यासोबत पुस्तकाच्या नावातच महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे या पुस्तकाला आता सोशल मीडियातून विरोध सुरू झाला असून यावरून वादंग निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.