ईडीकडून शरद पवारांवर झालेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही : फडणवीस

devendra fadnavis cm 696x348

 

मुंबई (प्रतिनिधी) ईडी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यावर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असे म्हणणं चुकीचे आहे. शरद पवार यांच्यावर झालेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची कारवाई आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

 

१०० कोटी पेक्षा जास्त रकमेचा जेव्हा कोणताही गुन्हा असेल तेव्हा त्यासंदर्भातली दखल ही ईडीला घ्यावीच लागते. अशा प्रकरणांमध्ये ईडी वेगळा एफआयर करत नाही. ईडीने केलेल्या या कारवाईशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. राज्य सरकार सूडबुद्धीने वागते आहे, जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली आहे, या प्रकारचे आरोप कालपासून होत आहेत त्याला काहीही अर्थ नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिखर बँक घोटाळा प्रकरणी २३ सप्टेंबर रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content