मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करणाऱ्याला अटक करा; मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (व्हिडिओ)

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परभणी येथील मनसेच्या शहराध्यक्ष यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरूवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला करून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही हत्या करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक शासन करावे, आणि आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी तसेच भविष्यात असे कोणतेही हल्ले कोणत्या पक्षाच्या नेता किंवा कार्यकर्त्यांवर होवून नये यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी‍ निवेदनात नमूद केली आहे.

यानिवेदनावर जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, शहराध्यक्ष विनोंद शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, सुमीत राठोड, राहूल चव्हाण, संजय पाटील, शहर उपमहानगरप्रमुख आशिष सपकाळे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/835497914491133

Protected Content