धरणगावात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा !

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील  सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत माळी यांनी केले.

 

वाचन प्रेरणा दिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार हे होते. यावेळी माजी राष्ट्रपती – मिसाईल मॅन – डॉ.ए. पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकानी  व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा आनंद घेतला. यावेळी शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व सांगितले व पुस्तक वाचनाने मस्तक सशक्त होते असे प्रतिपादन केले.  मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी मुलांनी जास्तीत जास्त ग्रंथालयातून अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. हीच डॉ. कलाम साहेबांना खरी आदरांजली ठरेल.

याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक एच.डी. माळी यांनी शाळेच्या ग्रंथालयाला सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे लिखित “सत्यशोधक विधी “हे पुस्तक भेट दिले.  प्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक एम.बी.मोरे, ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे, एम.के. कापडणे सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. सूत्रसंचलन पी.डी.पाटील तर आभार एस.एन.कोळी यांनी मानले.  यशस्वीतेसाठी ग्रंथपाल गोपाल महाजन व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content