जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याच्या निषेधार्थ मंत्री गिरीश महाजन याच्या उपस्थितीत भाजपा कार्यालयासमोर रविवारी ११ डिसेंबर रेाजी दुपारी २ वाजता निषेध आंदोलन करण्यात आले.
अधिक माहिती अशी की, खासदार सुप्रिया सुळे यांचे देशाच्या व राज्याच्या राजकारण व समाजकारणात मोठे योगदान आहे . त्यामुळेच भारतीय संसदेने त्यांना तब्बल सात वेळेस संसदरत्न पुरस्कार दिलेला आहे. असे असतांना देखील भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटिल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी ” घरी भाकरी थापा , स्मशानात जा ” असे बेताल व निंदनीय वक्तव्य केलेले आहे , असे वक्तव्य केल्या राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. असे असतांना पुण्यातील एका कार्यक्रमात एकाने त्यांच्यावर शाईफेक केली होती. या घटनेच्या निषेधार्थ बळीराम पेठ येथील भाजपा कार्यालयासमोर भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी बेटी बचाव बेटी पढावचे समन्वयक फडके, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.