शिवसैनिकांनी अडवली किरीट सोमय्या यांची गाडी

पुणे- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील ‘जम्बो कोविड सेंटर’ या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी पुणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले मात्र त्यांच्या विरोधात येथील शिवसैनिकांनी आक्रमक होत सोमय्या यांची गाडी अडवली. यावेळी काळी काळ गोंधळ निर्माण झाला होता.

‘लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ या पुण्यातील कंपनीला ‘जम्बो कोविड सेंटर’ चालवण्याचे कंत्राट देण्यात आलं होतं. सेंटर सुरू असताना त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला असून यासाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापण कारणीभूत असल्याचा आरोप सोमय्या यांनी व्यक्त केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘PMRDA’ ने हे कंत्राट भ्रष्ट मार्गाने या कामाचा अनुभव नसताना ‘लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस’ला ‘कोविड सेंटर’चे कंत्राट देण्यात आल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली. त्यामुळे लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि सरकार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली.

किरीट सोमय्या हे पुणे जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले दरम्यान झालेल्या झटापटीत सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोमय्या जमिनीवर पडले आणि काळी क्षण गोंधळ निर्माण झाला.

Protected Content