शेगावात सभेपूर्वीच मनसैनिक आणि काँग्रेस आमने-सामने

शेगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे राहुल गांधींच्या  सभेपूर्वीच मनसैनिक आणि काँग्रेस आमने-सामने घोषणा दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

 

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शेगाव येथे येऊन पोचली आहे.  त्यात मनसैनिकांना राज ठाकरे यांनी काळे झेंडे आणि सभा उधळून लावण्याचे आदेश दिले आहेत. ज्या राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल वक्तव्य केले आहे. त्याबद्दल राज्यात अनेक ठिकाणी मनसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. आज शेगाव देखील मनसैनिक राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत असताना तेथून भारत जोडोचे काँग्रेसचे कार्यकर्ते जात असताना त्यांच्यामध्ये आमना सामना होऊन घोषणाबाजी झाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

 

Protected Content