भुसावळात भर दिवसा तरुणावर चाकू हल्ला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात भर दिवसा तरूणावर चाकू हल्ला झाल्याने परिसर हादरला आहे.

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील हिमालया पेट्रोल पंपांसमोर एका महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांवर दुपारी २.३० वाजेच्या सुमारास चाकु हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

शहरातील नाहाटा महाविद्यालयात इयत्ता १२ वी मध्ये शिकत असलेला आदित्य कैलास सावकारे याच्यावर हिमालया पेट्रोल पंपांसमोर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड त्यांचे सहकारी प्रशांत परदेशी, निलेश चौधरी, तुषार पाटील, मिलिंद कंक, अतुल कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला ड्रामा केअर सेंटर मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

भर दिवसा कॉलेजात शिकणार्‍या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content