गुरूचारित्र्य वाचनाची श्री दत्त जयंतीदिनी समारोप

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्री स्वामी समर्थ बालसंस्कार व अध्यात्मिक केंद्रात श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला.

 

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पिठाचे पीठासीन श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या मार्गदर्शनातून भुसावळ रोड टेलिफोन ऑफिस जवळ बालसंस्कार व अध्यात्मिक केंद्रात श्री दत्त जयंती व सप्ताहाची विधी व गुरुचरित्र वाचन, अखंड हरिनाम सप्ताह, गणेशा याग, स्वामी याग, गीताई याग, रुद्रयाग, दत्त जन्मोत्सव, सत्यदत्त पूजन ,महाआरती अशा विविध कारणाचे आयोजन करण्यात आले होते या भक्तिमय सोहळ्यात यावल शहरासह तालुक्यातील महिला व पुरुष सेवकरी यांनी मोठा सहभाग नोंदविला होता महाराष्ट्रात श्री स्वामी समर्थांच्या सेवा मार्गात अखंड सेवेकरी या मार्गात जोडले गेले आहेत तसेच या सप्ताहाला अन्य साधारण महत्व आहे.  दत्त जयंती सोहळा निमित्ताने सुंदर अशी रांगोळी फुलांसह आकर्षक अशा पद्धतीने सजविण्यात आले होते.

गेल्या सात दिवसापासून अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होता. यात गुरुचरित्र पारायण सोहळा विविध देवतांचे यज्ञ मंडपात मांडणी व पूजन तसेच सात दिवस अखंड रात्रंदिवस विना वादन श्री स्वामी समर्थ जप श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत आचे वाचन असे अखंड सात दिवस सुरू होते.  यात दिवसा सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत यावल तालुक्यातील महिलांनी तर संध्याकाळी सात ते सकाळी सात पर्यंत तर पुरुषांनी अखंड नामजप सप्ताहात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

प्रत्येक दिवशी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले यात  पहिल्या दिवशी ग्रामदेवता सन्मान मंडल मांडणी अग्नी प्रदीपण व दुसऱ्या दिवशी मंडळ स्थापना अग्नी स्थापना स्थापित देवता हवन तिसऱ्या दिवशी नित्य सहकार गणेश याग मनोबल या चौथ्या दिवशी नित्य सहकार चंडी याग स्वामी याग रुद्र मल्हार या बली पूर्ण होती व नंतर सत्यदत्त पूजन देवता विसर्जन व अखंड नामजप यज्ञ सप्ताह सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आले. ८ डिसेंबर रोजी सकाळी भूपाळी आरती सत्यदत्त पूजन व त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता महानैवेद्य आरती अखंड नामजप यज्ञ सप्ताह समारोप झाला याप्रसंगी स्वामी समर्थ केंद्रातील प्रमुख प्रतिनिधींनी सेंद्रिय शेती सामूहिक सामुद्रिक शास्त्र पर्यावरण प्रकृती विवाह संस्कार व पशुसंवर्धन मुलांवर संस्कार कसे करावे या विविध विषयांवर मार्गदर्शन व आपल्या जीवनात विविध समस्या येणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शन ह्या विविध विषयावर सात दिवस वेळोवेळी केंद्रातील बाळू भोगे, भरत शिंपी,यांनी मार्गदर्शन केले. या सप्ताहात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ केंद्र यावल केंद्रातील तालुका प्रतिनिधी अनिता भोईटे,केंद्र प्रतिनिधी व सेवेकर्‍यांनी परिश्रम घेतले.

Protected Content