पार्किंग केलेली कारची चोरी

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गंधर्व कॉलनीतील ज्ञानप्रभा अपार्टमेंट समोरून २ लाख रूपये किंमतीची स्वीप्ट कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी भरत पाटील (वय-२१) रा. ज्ञानप्रभा अपार्टमेंट, गंधर्व कॉलनी, जळगाव ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची स्वीप्ट कार क्रमांक (एमएच १९ बीजे ७१७४) ही अपार्टमेंटच्या समोर पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २ लाख रूपये किंमतीची ही कार चोरून नेल्याचे रविवारी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आले. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू कार कुठेही दिसून आली नाही. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.

Protected Content