अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देशाच्या सर्वोच्चपदी म्हणजेच राष्ट्रपतीपदी द्रोपदी मुर्मू यांची निवड झाल्याचे औचित्य साधून ‘जल्लोष स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे मंगळवार दि. २६ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.
फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुपतर्फे अॅड.ललिता श्याम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व ग्रुपच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘जल्लोष स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे मंगळवार दि. २६ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या १५ व्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर द्रोपदी मुर्मू या प्रथम आदिवासी महिला यांची निवड झाली असून एका अर्थाने हा स्त्री शक्तीचा विजय आहे. महिलांचा अभिमान वाटावा अशा घटनेचे औचित्य साधून ‘जल्लोष स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.