‘सेक्रेड गेम्स’ नेटफ्लिक्समधून हिंदू धर्माची बदनामी : पोलिसात तक्रार

sacred games 1531394955

मुंबई, वृत्तसंस्था | शिवसेनेच्या आयटी सेलमधील कार्यकर्ते असणाऱ्या रमेश सोलंकी यांनी ‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सविरोधात काळबादेवी येथील एलटी मार्ग पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या नेटफ्लिक्सवरुन हिंदू धर्माची बदनामी होत असल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचे सोलंकी यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

 

सेक्रेड गेम्स या सिरीजमध्ये पंकज त्रिपाठीने साकारलेल्या गुरुजी या भूमिकेच्या माध्यमातून निर्मात्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुजींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे अशा अर्थाची तक्रार करण्यात आली आहे.

“सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सच्या सिरीजमधून हिंदू धर्माला बदनाम करण्यात आले आहे. जगभरातील सर्व गुन्ह्यांसाठी हिंदू जबाबदार असल्याचे या सीरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. लैंगिक दृष्यांच्या आधारे भारतीय संस्कृतीमधील गुरु शिष्याच्या परंपरेलाही बदमान करण्याच्या प्रयत्न या सीरीजमधून करण्यात आला आहे”, असा आरोप सोलंकी यांनी केला आहे. सेक्रेड गेम्सबरोबरच नेटफ्लिक्सवरील हिमा कुरेशीची भूमिका असणाऱ्या ‘लैला’, राधिका आपटेची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘घौल’ आणि हसन मिन्हाज याच्या स्टॅण्डअप कॉमेडी शोच्या माध्यमातून देशाची आणि हिंदू धर्माची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही आपल्या तक्रारीमध्ये सोलंकी यांनी म्हटले आहे.

Protected Content