अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० डिसेंबर रोजी रात्री साडेदहा ते ११ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील राहुल छोटू अहिरे (वय 22) या तरुणाने अल्पवयीन मुलीला काहीतरी फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु अल्पवयीन मुलगी कुठेही मिळून आली नाही. यासंदर्भात रविवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी राहुल छोटू अहिरे (वय-२२) रा. नगरदेवळा ता. पाचोरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल शेख करीत आहे.

 

 

 

Protected Content