भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

गांधीनगर वृत्तसंस्था | गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पक्षाचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली असून आज पक्षाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांनी याबाबतची घोषणा केली.

 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काल आकस्मीकपणे राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागेल याबाबत चर्चा सुरू होती.  विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजप विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक झाली. थरं तर रूपाणी यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, पुरुषोत्तम रुपाला, प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांची नावे चर्चेत होती. तर एखाद्या वेळेस मोदी आणि शाह हे धक्कातंत्राचा वापर करून नवीन नाव समोर करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. नेमके घडलेही तसेच. आणि चर्चेत नाव नसणारे भूपेंद्र पटेल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांनी याची घोषणा केली.

Protected Content