भुसावळ तालुका कुस्तीमध्ये यशस्वी पैलवानांचा संघ जिल्ह्यासाठी आज होणार रवाना

वरणगाव प्रतिनिधी | ६४ व्या महाराष्ट्र केसरी गटात सहभागी होणेसाठीची तालुकास्तरीय गादी व माती गट कुस्ती स्पर्धा येथिल हनुमान व्यायामशाळेत नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये भुसावळ तालुक्यातील पैलवानांनी यश मिळविले असून आज रविवारी जिल्ह्यासाठी संघ रवाना होणार आहे.

 

वरणगाव येथिल हनुमान व्यायाम शाळेत पार पडलेल्या तालुकास्तरीय स्पर्धामध्ये गादी व माती गटात विजयी झालेले पैलवान अनुक्रमें गादी विभागात प्रविण माळी(57 कि.) अक्षय माळी ( 65 ) सै .राईल (70) विशाल रणधीर (74) निरज चौधरी (79) वैभव मेढे(86) हर्षल पाटील(92) मो .नौशाद(97 ते125) आदींची व माती विभागात शुभम भोई(57) मो . रिजवान (61) शे . मुदस्सर(65) किरण माळी(70)सै.शादाब(74) खेमचंद भोई(79) श्रीराम भोई(86) पवन भोई(97 ते125) यांची निवड झालेली आहे. आज रविवार दि. ३१ रोजी चाळीसगाव येथे जिल्हा कुस्ती स्पर्धांचे आयोजन होणार असुन सर्व यशस्वी पैलवानांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन तालुका कुस्तीगीर संघअध्यक्ष पैलवान नामदेव मोरे, उपाध्यक्ष पैलवान सुपडू सोनवणे व दिनेश देशमुख शे .जमील, संजय बावस्कर, एकनाथ भोई,’ प्रशांत निकम, रामदास माळी, शे .हकीम, पैलवान दिलीप संगेले, राजकिरण निकम,’ शे .ईस्माईल, बाळासाहेब चव्हाण, सत्यनारायण गोडियाले, शांताराम सपकाळे, प्रमोद पाठक ,पुनमचंद भोई . रामरविन्द्र रणधिर ‘दिलीप मराठे ,भिवाजी बावस्कर आदींनी केले आहे .

Protected Content