सैनिकी शाळेतील शिक्षकांचे आमदारांना साकडे

अमळनेर, प्रतिनिधी | राज्यातील सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडीवरील नियुक्त शिक्षकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी येथील आमदार तथा शासकीय अनुसुचित जमात कल्याण समितीचे सदस्य अनिल भाईदास पाटील यांना राज्य सैनिकी शाळा आदिवासी तुकडी कर्मचारी कृती समितीच्या सदस्यांनी निवेदन देत साकडे घातले.

 

निवेदनाचा आशय असा की, राज्यातील 19 जिल्ह्यातील सैनिकी शाळांमधील नियुक्त शिक्षकांचे पगार हे लेखाशिर्ष 2202 एच 973 या अंतर्गत होत असतात, त्याच बरोबर राज्यातील आदिवासी उपयोजना अंतर्गत योजना- 36 ही शालेय शिक्षण विभागाला सुरू असलेले लेखाशिर्ष 2202H973 (सैनिकी शाळा आदिवासी तुकडी वेतन सहाय्य अनुदान), लेखाशिर्ष 2202/1901 व 2202/1948 (अनुदानित शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी उपायोजना सहाय्य वेतन अनुदान) सुरू आहे. हे तिन्ही लेखाशिर्ष हे “प्लॅन टू नॉन-प्लॅन” अर्थात “योजनांनार्गत मधून योजनाबाह्य” (अनिवार्य) मध्ये वर्ग करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात तारांकित अथवा लक्षवेधी प्रश्न मांडून राज्यातील शिक्षकांना न्याय मिळवून देणारा असल्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले. यावेळी सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडी संदर्भातील संभ्रमावस्था दूर करण्याबाबत तसेच शिक्षकांची पगार समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी राज्य सैनिक शाळा कृती समितीचे सदस्य तथा विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक एस.ए.बाविस्कर, जी.पी.हाडपे, शरद पाटील, आर.ए.घुगे, टी.के.पावरा व उमेश काटे आदी उपस्थित होते.

Protected Content