दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बस सेवा सुरु करा

 

रावेर प्रतिनिधी ।कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी बस व इतर सेवा बंद करण्यात आल्या होत्या. परतू, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर शहरी भागात बस सेवा सुरु करण्यात आली असून ग्रामीण भागास वगळण्यात आहे आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी मनसे रावेर तालुकातर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी होऊन जनजीवन पूर्व पदावर येत असतांना ग्रामीण भागातील प्रवाशांची हेळसांड होता आहे. ही हेळसांड त्वरित थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रावेर तालुका अध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सणानिमित्त सासरवरून खेडोपाडी महिला माहेरी येत असतात, त्यांची गैरसोय लक्षात घेता तालुक्यातील बसेस त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Protected Content