भुसावळात लेडीज इक्वालिटी रन उत्साहात

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ रनर्स अँड स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने शहरात लेडीज इक्वालिटी रनचे आयोजन करण्यात आले.

 

रविवारी भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे लेडीज इकॉलिटी रन चे आयोजन करण्यात आले. यात तब्बल ६२७ महिलांनी सहभाग नोंदविला. ३ किमी, ५ किमी व १० किमीमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. ५ किमी व १० किमीचे रनिंग पूर्ण केल्यानंत धावपटूंना ताबडतोब मोबाईलवर किती वेळेत अंतर पूर्ण केल्याचा संदेश प्राप्त होत होता. यामुळे त्यांचा आनंद  दुगुणित होत होता.

 

सकाळी ठिक ६ वाजता  १० किमी, ६:२० वाजता ५  किमी व  ६.४० वाजता ३ किमीच्या स्पर्धेस रेल्वे क्रिडांगणावरून सुरुवात करण्यात आली. यावेळी धावपटूंना झेंडा दाखवून उत्साह वाढविण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, सौ. रम्या कन्नन, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, भेल इंडीयाचे मुख्य प्रबंधक दिनेश जावडे, बढे फॅपिटल्सच्या संचालिका तृप्ती बढे, हॉटेल मल्हारचे संचालक प्रमोद धनगर, न्यूट्रीमॅक्स चे राहुल पाटील, बी एम ज्वेलर्सच्या दिपा अग्रवाल, रेस संचालक प्रविण फालक उपस्थित होते. या रेसमध्ये पोलीस अधिक्षकांच्या पत्नी रम्या कन्नन यांनी स्वतः  १० किमी धावून महिलांचा उत्साह वाढविला.

 

धावायला सुरुवात केल्यानंतर ठिकठिकाणी धावपटूवर पुष्पवृष्टी होत होती. त्याशिवाय टाळ्यांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या आवाजात व काही ठिकाणी बँड व लेझीमदारे धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी टिकठिकाणी विद्यार्थी, स्वयंसेवक, शाळा-महाविद्यालयांचे व सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

यामध्ये गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, टेमानी डी. एल. हिंदी स्कूलच्या स्काइड-गाइड व एनसीसीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी ,भुसावळ हायस्कूलचे विद्यार्थी,रेल्वेचा एमओएच विभाग, लॉयन्स क्लबचे पदाधिकारी, एन के नारखेडे इन्गिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक व विद्यार्थिनीचे लेझीम पथक विशेष लक्ष वेधून घेत होते. राजे फिटनेसचे प्रतिनिधी,  जय झुलेलाल गृपचे सदस्य, ज्येष्ठ नागरीक संघ, व राधाकृष्ण प्रभात फेरीचे सदस्य, इनरव्हील क्लब’ व राहत योगचे सदस्य मोठ्या उत्साहात

धावपटूंचे स्वागत करीत होते. याशिवाय शहरातील असंख्य नागरीक व बाहेरगावचे प्रवासी देखील टाळ्या वाजवून व घोषणा देत महिला घावपटूंचा उत्साह द्विगुणीत करीत होते. याशिवाय  आयोजकांतर्फे ठिकठिकाणी घावपटूंसाठी पेयजल, पाणी, बिस्कीट, चॉकलेट, एनर्जी ड्रिंक ची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनात  रुग्णवाहीका व फिरते मेडीकल सपोर्ट सिस्टिम उपलब्ध होती.

 

याशिवाय ब्रिजेश लाहोटी, रणजित खरारे व सचिन अग्रवाल आपल्या शेकडो धावपटू व सायकलपटूंसह व पोलीस विभागाच्या सहायाने रहदारीचे नियमन करीत होते. गणसिंग पाटील फोटोग्राफी टिमच्या सहाय्याने धावतानाचे क्षण अविस्मणीय करीत होते.

 

रन पूर्ण केल्यानंतर श्रीकांत नगरनाईक, अभिजीत शिंदे व हर्षल लोखंडे यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक धावपटूस पदक दिले जात होते व नात्याची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय फिजिओथेरपीची टीम देखील उपलब्ध होती.

 

सर्व धावपटु क्रिडांगणावर परतल्यावर कौस्तुभ मंत्री यांनी स्ट्रेचिंग एक्सरसाईज घेतली. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमास सुरुवात झाली व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत प्रविण वारके, डाॅ. निलिमा नेहेते व डाॅ. चारुलता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले.

 

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :

 

५ किमी (वयोगट १२ ते ४०) : जान्हवी रोझोदे -प्रथम , शिवानी पाटील- द्वितिय, छाया ढोले -तृतीय

, (वयोगट ४१ पेक्षा अधिक) : शैला भारंबे- प्रथम, सुनिता सिंग-द्वितिय, डॉ सीमा पाटील- तृतीय

१० किमी (वयोगट  १६ ते ४० वर्षे) = अश्विनी काटोले -प्रथम, डॉ. अर्चना

काबरा – द्वितीय, धनस्री चौधरी-तृतीय (वयोगट ४१ पेक्षा अधिक) : डॉ रती महाजन-प्रथम, दिपा स्वामी- दितिय, वैशाली बडगुजर-  तृतीय

Protected Content