जळगावात राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन २ व ३ एप्रिल रोजी  करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी बळीराम पेठ येथील पत्रकार भवनात सोमवार १३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

 

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बौद्ध साहित्य प्रसार संस्था संचलित बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्रच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन हे जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे २ व ३ एप्रिल रोजी होत आहे. या साहित्य संमेलनामध्ये प्रसिद्ध साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर हे अध्यक्षपदी राहणार असून रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी २ एप्रिल रोजी संविधान सन्मान रॅली शहरातून काढण्यात येणार आहे, तर दुसऱ्या दिवशी ३ एप्रिल रोजी धम्म जागृती रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या संविधान सन्मान रॅली व धम्म जागृती रॅलीसाठी जळगाव जिल्ह्यातील १० गावांची निवड करण्यात आलेली आहे. शिवाय संचलन व मानवंदना समता सैनिक दल व महार रेजिमेंट मार्फत दिली जाणार आहे. अशी देखील माहिती बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मुकुंद शिरसाट यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सोमवार १३  मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता दिली आहे.  याप्रसंगी स्वागताध्यक्ष भरत शिरसाट, कार्यवाह समितीचे अध्यक्ष अशोक बैसाने यांच्यासह आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Protected Content