Home धर्म-समाज शिरसाळा येथील हनुमान देवस्थानला महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांची भेट

शिरसाळा येथील हनुमान देवस्थानला महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांची भेट

0
177


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । ‘बोदवड तालुक्यातील जागृत हनुमान मंदिर,शिरसाळा या देवस्थानाला तिर्थक्षेत्र ब’ वर्ग दर्जा प्राप्त झालेला असून या मंदिरामध्ये आवश्यक असलेल्या मंदिर व भाविकांच्या दृष्टीने सोयी सुविधा तसेच इतर बाबींची माहिती घेऊन विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात संबंधित डिझायनर,अधिकारी यांना तशा सूचना केल्या.

यावेळी संपूर्ण मंदिराची पाहणी करून मंदिराला मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण निर्माण होऊन भाविक व पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षकता आणता येईल या संदर्भात सकारात्मक चर्चा केली. ‘यावेळी महामंडलेश्र्वर जनार्दन हरिजी महाराज यांचे आगमन झाले असता,त्यांचे सविस्तर चर्चा करून भाविकांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा यासंदर्भात त्यांचे ही मार्गदर्शन घेतले.

दरम्यान, याप्रसंगी जनार्दन हरीजी महाराज यांनी आज तेथे आलेले आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. यावर आमदार पाटील यांनी संबंधीतांना आवश्यक त्या सूचना देण्याची ग्वाही दिली.


Protected Content

Play sound