भुसावळात रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांचे घरातच नमाज पठण

भुसावळ प्रतिनिधी । मुस्लिम बांधवांचा पवित्रा रमजान महिन्याला आजपासून सुरूवात झाली. ज्या वेळेस चांद दिसल्यावर तराबीची नमाज सुरू होते. पुढील 26 दिवसापर्यंत नमाज पठण केले जाते. रमजान महिन्यात ताराबी नमाजला विशेष महत्त्व आहे.

कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी केली प्रार्थना
लहानग्यापासून ते अबालवृद्ध मज्जिदमध्ये एकत्रित येत अल्लाची ईबादत करत असतात. मात्र लॉकडाऊन व कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून शासनाचे नियमाचे पालन करत मुस्लिम बांधव आपल्या घरातच कुटुंबियांसमवेत ५ वेळीची नमाज पठण करत अल्लाची ईबादात करत आहेत. देशावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना ही या निमित्ताने करत आहे.

नमाज घरीच पठण करण्याचे आवाहन
आज पवित्र रमजान महिन्याच्या पर्वाला सुरवात झाल्याने शहरातील सर्वच मुस्लिम बांधवांनी सायंकाळी मशिदीत एकत्रितपणे नमाज न अदा करता मशिदीत होणारी गर्दी टाळून आपल्या घरीच नमाज पठण करुन प्रशासनाला सहकार्य केले. प्रत्येक मशिदीत केवळ मौलाना यांनीच नमाज पठण करून सर्व मुस्लिम समाज बांधवांनी आपल्या घरीच नमाज पठण करावे, असे आवाहन सर्व मौलानांतर्फे करण्यात आले.

Protected Content