भुसावळात महाशिवरात्रीनिमित्ताने नुपूर महोत्सव उत्साहात साजरा

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीला नुपूर महोत्सवाचे आयोजन खाचणे हॉल येथे करण्यात आले. या महोत्सवात नृत्यश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

मंगळवार दि. १ मार्च्र रोजी आयोजित नुपूर महोत्सवाचे उद्घाटन बाजारपेठ पोलिस स्टेशनचे राहुल गायकवाड , झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आरुणकाका पाटील, संस्कृत शिक्षक ब्रजेश पंडीत, तसेच पाहुणे कलाकारांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नटराज पुजन करुन झाले.
प्रास्ताविक नुपूरचे संचालक रमाकांत भालेराव यांनी केले. यावर्षी महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने गेल्या कालावधीत मदत करणाऱ्यांचा व सहभागी कलावंतांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे भरतनाट्यम कलाकार पलक उपाध्याय, प्रार्थना तिवारी तसेच शर्मिष्ठा घोष ( मोहिनीअट्टम, भिलाई )यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देउन नृत्यश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. सादरीकरण करतांना मैत्री मालवीय हीने देवी स्तुती सादर केली. शर्मिष्ठा घोष हिने कुचिपुडी नृत्य सादर केले. नीयती राणे व उर्वशी कोळी यांनी कथक नृत्यातून त्रिताल सादर केला. भरतनाट्यम हा प्रकार पलक उपाध्याय यांनी सादर करुन रसिकांची मने जिंकली. नुपूर भालेराव हिने शिवतांडव स्तोत्र सादर करुन रसिकांची दाद मिळवली. प्रार्थना तिवारी हिने भरतनाट्यम सादर केले. नंतर मैत्री मालविय हीने कथक सादर केले. शर्मिष्ठा घोष हिने मोहिनीअट्टम सादर केले. नुपूरच्या विद्यार्थिनी निलम धाडसे, मेघा कुळकर्णी , सीमा पाठक, उर्वशी कोळी, नीयती राणे, हेमांगी पंडागरे यांना साहवेना आनुराग व ईलु सा हा देह या गाण्यावर कथक सादर केले. पलक उपाध्याय व प्रार्थना तिवारी यांनी भरतनाट्यम सादर केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. गिरिष कुळकर्णी यांनी केल. यावेळी सामाजिक उपक्रमांतर्गत झाडांची रोप वितरित करण्यात आलीत. वितरण व्यवस्था पर्यावरण जागरण मंच, शैक्षीक आगाज, व समता फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे नाना शंकर पाटील, सुरेंन्द्रसिंग पाटील यांनी चोख सांभाळली. कार्यक्रमास रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यशस्वितेसाठी राजेंन्द्र जावळे, शुभम कुळकर्णी , शंभु गोडबोले, प्रांजल कुळकर्णी , विकी चव्हाण, नाना शंकर पाटील, सुरेंन्द्रसिंग पाटील, राहुल पाटील, प्रकाश फेगडे, आदींनी परिश्रम घेतले. मंचावर नुपूरच्या नृत्य शिक्षिका चारु भालेराव यांची उपस्थिती होती.

Protected Content