चाळीसगावात राज्यपालांच्या विधानावरून शिवप्रेमी संघटना आक्रमक

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी शिवरायांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल चाळीसगावात शिवप्रेमी संघटना आक्रमक झाली आहे. यामुळे तात्काळ त्यांनी राज्याची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा शिवप्रेमी संघटनांनी निवेदनाद्वारे केला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी औरंगाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात रामदास हे शिवरायांचे गुरू होते. त्यामुळे रामदासच नसते तर शिवरायांना कोण ओळखले असते असे संतापजनक विधान केले. यामुळे
शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या संतापजनक विधानाच्या निषेधार्थ शहरातील तहसील कार्यालय समोर १ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता शिवप्रेमीं संघटनानी निषेध आंदोलन करून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही. असा इशारा मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिले.

निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या स्वराज्याची संकल्पना ही राष्ट्रमाता जिजाऊ व राजे शहाजी यांनी मांडली. शिवरायांनी ती संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणली. त्यासाठी त्यांना त्यांचे आई वडील दोघांचेही मार्गदर्शन लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू ह्या राष्ट्रमाता जिजाऊ या त्यांच्या आईच होत्या.तसेच त्यांच्यावर संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या विचारांचाही प्रभाव होता. त्या अर्थाने तुकाराम महाराज सुद्धा त्यांचे गुरू आहेत. यात रामदास स्वामी कुठेच नाहीत. मात्र तरीही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी औरंगाबाद येथे आपली गरळ ओकली.

यावेळी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, वीर भगतसिंग परिषदेचे पंकज रणदिवे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुधीर पाटील, मराठा महासंघाचे खुशाल बिडे, जळगाव जिल्हा दूध संघ संचालक प्रमोद पाटील, सभापती अजय पाटील, मा .नगरसेवक दिपक पाटील, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे भैय्यासाहेब पाटील, शेकापचे गोकुळ पाटील, जयश्री रणदिवे, योगेश पाटील, पंकज पाटील, आकाश पोळ, राकेश राखुंडे, सचिन पवार, प्रदीप चिकणे, प्रदीप पाटील, रवींद्र देशमुख, सोनु देशमुख, विलास मराठे, स्वप्निल गायकवाड, संजय कापसे, दिलीप पवार, भरत नवले , प्रदीप मराठे, प्रशांत अजबे, मुकुंद पवार आदी उपस्थित होते.

Protected Content