स्व.कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालयात पालक बालक स्वागत सोहळा

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील येथील श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय शासन निर्देशाप्रमाणे दि. १ मार्च पासून सुरु करण्यात आले. शाळेच्या प्रथम दिनी पालक बालक स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

पालक बालक स्वागत सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंदा दवे (मुंबई) यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून कलादेवी जोशी (भुसावळ), प्रदीप पांडे, मिनाक्षी पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले. यावेळी शाळेचे दिवंगत कर्मचारी विनोद धोंडू चव्हाण आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना उपस्थित सर्व पालक बालक आणि मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व विशेष बालकांना दिशा प्रकल्पाची कार्य पुस्तिका आणि गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. उपस्थित विशेष विद्यार्थी गोपाल ईश्वर वंजारी, गणेश जिभाऊ पाटील, अनिकेत प्रमोद अमृतकर, देवांश दतात्रय चोधरी, दीपक लक्ष्मण पाटील, मयूर भाऊसाहेब पाटील, प्रमोद शांताराम पाटील आदी सर्व मुलांचे मान्यवरांचे हस्ते स्वागत करण्यात आले. सोबतच पालक प्रमोद अमृतकर, हर्षल देशमुख, ईश्वर वंजारी, वंदना वंजारी, शकुंतला पाटील, सुदाम चौधरी, लक्ष्मण बारसे, जिभाऊ पाटील, गणेश सूर्यवंशी, निलेश पाटील आदी पालकांचे याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रमोद अमृतकर, ईश्वर वंजारी आणि सुदाम चौधरी या पालकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. श्री. संत गाडगेबाबा शिक्षण संस्था, पाचोराच्या अध्यक्षा मीनाक्षी पांडे आणि सेक्रेटरी प्रदीप पांडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे अध्यक्ष मंदाताई दवे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शिक्षकांनी मानले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content