भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील एमआयडीसीतील गौरव सीएनसी टुल्स ॲण्ड डायमेकर कंपनीची खिडकी तोडून आत प्रवेश करत कंपनीतून ८ हजार ३०० रूपये किंमतीच्या साहित्यांची चोरी केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गौरव अनिल तायडे वय २२ रा. फकरी शिवार, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील एमआयडीसीतील गौरव सीएनसी टुल्स ॲण्ड डायमेकर नावाची कंपनी आहे. २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्याने कंपनीची खिडकी तोडून आत प्रवेश करत कंपनीतून ८ हजार ३०० रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आली. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र माहिती जाणून घेतली परंतू चोरी संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप बडगे हे करीत आहे.