भुसावळ प्रतिनिधी । कोरानाचे रूग्ण भुसावळ शहरात दिवसेंदिवस वाढत असून शहर हॉटस्पॉट ठरले आहे. त्या पाश्वभुमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरसेवक किरण भागवत कोलते यांनी त्यांच्या प्रभागातील प्रत्येक घरोघरी जाऊन सॅनिटायझरची फवारणी करून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या कोरोना रोग प्रतिबंधात्मक औषधीचे मोफत वितरण केले.
किरण कोलते यांच्या प्रभात एका व्यक्तीचा कोरोनाच्या विषाणुमुळे मृत्यु झाल्याने नागरिकांच्या आरोग्यासाठी सॅनेटायझरची फवारणी तसेच रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन या सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे. किरण कोलते यांनी त्यांच्या प्रभागातील आनंद नगर, कस्तुरी नगर, सुरभी नगर, रामेश्वर नगर, प्रोफेसर काँलनी, देना नगर, लक्ष्मी नारायण नगर आदी भागात सुमारे ७ हजार ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या कोरोना रोगप्रतिबंधात्मक औषधीचे वितरण केले.
दरमहिन्याला प्रभागातील प्रत्येक घरोघरी जाऊन सॅनिटायझरची फवारणी व गोळ्याचे मोफत वाटप करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. नागरीकांनी विनाकारण बाजारात गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. यावेळी राजु चौधरी, पिंटू बऱ्हाटे, चंदन ढाके, हर्षल चौधरी, पंकज कोलते, राहुल फिरके, गोलु वारके, तेजस झांबरे, आदी उपस्थित होते.