‘तशा’ लोकांची माहिती पालिकेला द्या, नाव गोपनीय ठेवण्यात येईल : निलेश चौधरी

धरणगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन व तहसील प्रशासनमार्फेत दक्षता घेण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासनामार्फत पुणे, मुंबई किंवा परराज्यातुन किंवा परदेशातुन आलेल्या प्रवाशांची,व्यक्तींची माहीती त्यांनी स्वतः किंवा इतर नागरिकांकडून फॉर्म भरून द्यावा असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सांगितले की, त्या व्यक्तीने फॉर्म भरल्यानंतर नगरपालिकेमार्फत ती व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीची माहीती द्यावयाची असेल त्या व्यक्तीच्या कुटुंबप्रमुखाचे नाव व संपर्क क्र. कळविण्यात यावा. ही माहीती गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष श्री. चौधरी यांनी सांगितले. सदर प्रवाशी आजारी असल्यास नजिकच्या शासकिय आरोग्य संस्थेत उपचार घ्यावा अथवा नजिकच्या करोना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष श्री. चौधरी यांनी केले आहे. या फॉर्ममध्ये माहिती कोण भरते आहे ? माहिती भरणाऱ्याचे पूर्ण नाव, माहिती भरणाऱ्याचा संपूर्ण पत्ता, माहिती भरणाऱ्याचा संपर्क क्रमांक, प्रवाशी/व्यक्ती धरणगाव नगरपरिषद हद्दीतील आहे किंवा नाही, प्रवाशी/व्यक्तीचे संपूर्ण नाव, प्रवाशी/व्यक्तीचा संपूर्ण पत्ता, प्रवाशी/व्यक्तीचा संपर्क क्रमांक, प्रवासाचा दिनांक, कोठून प्रवास केला शहराचे नाव, व्यक्तीला काही वैद्यकीय समस्या आहे का ? वैद्यकीय समस्याचे वैद्यकीय तपशील याची माहिती भरून द्यावी लागणार आहे.

पहा :निलेश चौधरी नेमकं काय म्हणाले
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/847688332385028/

Protected Content