एरंडोल येथे खाजगी कोविड केअर सेंटर व मेडिकल स्टोअरची अचानक तपासणी

 

एरंडोल,  प्रतिनिधी । येथील खाजगी कोविड केअर सेंटर व मेडिकल स्टोअर ची प्रांताधिकारी विनय गोसावी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली.

यावेळी प्रत्यक्ष कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना प्रत्यक्ष भेटुन त्यांना काही समस्या आहेत का ? त्यांना बिल व मिळणारे औषध,इंजेक्शन यांच्या बाबत माहिती घेतली. तसेच या दोघ अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे रुग्णांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.यावेळी शहरातील कल्पना हॉस्पिटल,अष्टविनायक कोविड केअर सेंटर,सुयश हॉस्पिटल अशा ३ खाजगी कोविड केअर सेंटर व २ मेडिकल स्टोअर ची तपासणी दोघं अधिकाऱ्यांनी केली.याप्रसंगी अधिकाऱ्यांना वरील कोविड केअर सेंटर व मेडिकल स्टोअर मध्ये रुग्णांचे चांगल्या प्रकारे व योग्य मोबदला घेऊन इलाज होत असल्याचे आढळुन आले.तसेच मेडिकल स्टोअर मध्ये सुद्धा योग्य मोबदला घेऊन औषधी दिल्या जात असल्याचे दिसुन आले.दरम्यान तालुक्यातील या अचानक तपासणी दौऱ्याने प्रांताधिकारी विनय गोसावी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख यांचे कौतुक होत आहे.

 

Protected Content